कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी सांगितले त्यांचे सलमान, ऐश्वर्यासोबतचे नाते, म्हणाले, सलमान आणि एश्वर्या..

मुंबई । टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये नट्टू काकाची भूमिका करणारे अभिनेता घनश्याम नायक सध्या कर्करोगाने ग्रस्त आहे. घनश्याम नायक हे केमोथेरपी घेत आहेत, नुकतेच त्यांनी सांगितले की, त्यांना बरे वाटत असून ते लवकरच पुन्हा शुटिंगमध्ये परत येण्याची वाट पाहत आहे.

टीव्ही व्यतिरिक्त घनश्याम नायक यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी सुमारे २५० हिंदी आणि गुजराती चित्रपट केले आहेत. घनश्याम नायक यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात विठ्ठल काकाची भूमिका केली होती.

या चित्रपटाने काही दिवसांपूर्वीच २२ वर्षे पूर्ण केली. त्यासंदर्भातील आठवणी सांगत घनश्याम नायक यांनी त्यावेळी सेटवर वातावरण कसे असायचे ते सांगितले. घनश्याम यांनी सांगितले की ‘हम दिल दे चुके सनम’शी खूप काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.

त्यावेळी ऐश्वर्या राय चित्रपटसृष्टीत नवीन होती. ती माझा खूप आदर करत होती. मी तिला गुजराती नृत्य शिकवले. ती खूप वेळा माझ्या पायाला आदराने स्पर्श करायची. मी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या देखील अगदी जवळ होतो.

संपूर्ण युनिट माझा आदर करीत आणि माझ्यावर प्रेम करत होते. यासोबतच घनश्याम नायक यांनी सांगितले की, चित्रपट निर्मितीच्या वेळी मी संजय लीला भन्साळी यांना खूप मदत केली होती. आजही सलमान खान मला विठ्ठल काका म्हणतो.

जेव्हा जेव्हा सलमान ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवर आपल्या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी येतो, तो नेहमी माझी भेट घेत असतो. जेव्हा जेव्हा तो मला भेटेल तेव्हा तो मला मिठी मारतो. असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करुन तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक कारण आले समोर

पंगा गर्लची हुशारी! कंगनाने ‘या’ दिग्दर्शकाला चित्रपटातून काढले बाहेर, म्हणाली…

‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.