मुलगी जन्माला आली आणि नशीबच बदललं; थेट भारतीय टीममध्ये झाली निवड

मुंबई | आताच आयपीएलचा मौसम संपला. आता सगळे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी भारतीय संघामध्ये अनेक बदल करण्यात आले. काही वादविवादही झाले. पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम निश्चित करण्यात आली आहे.

त्यातलाच एक खेळाडू टी. नटराजन याचीसुद्धा टी-२० टीममध्ये निवड झाली आहे. पण त्याची टीममध्ये निवड यासाठी झाली आहे की, वरून चक्रवर्ती याला दुखापत झाली आहे त्याच्याऐवजी नटराजनला घेण्यात आले आहे.

पण त्याला यासोबत आणखी एक आनंदाची बातमी २ दिवस अगोदर मिळाली होती. नटराजनला कन्यारत्न झाले होते. त्याची पत्नी पवित्रा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीचा जन्म होताच दोनच दिवसात त्याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे त्याचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता.

दरम्यान, नटराजन याने आयपीएलमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हैदराबाद कडून खेळताना त्याने सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकले आहेत. तसेच १६ सामन्यात १६ बळी त्याने घेतले आहेत. हैदराबादमध्ये राशीद खान यांच्यानंतर नटराजन याने सर्वाधिक बळी घेतल्या आहेत.

नटराजनसोबत हिटमॅन रोहित शर्माही टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. तसेच संजू सॅमसन वनडेसाठी जाणार आहे. इशांत शर्मा सध्या दुखापतीवर उपचार घेत आहे. त्यातून बरे झाल्यानंतर तो टेस्ट टीममध्ये खेळणार आहे. विराट कोहली पहिली टेस्ट झाल्यानंतर भारतात परतणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही आहे कारण…

नितीशकुमार मुख्यमंत्रीपद सोडणार ? केले मोठे विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.