अभिनंदनला सोडा नाहीतर आपलं काही खरं नाही; बाजवाची कशी फाटली होती खासदारानेच केलं उघड

मुंबई | पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा बुरखा टराटरा फाटला आहे. भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परतल्यानंतर पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांनी इम्रान सरकारची भीती उघड केली आहे.

‘विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं नसतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता, असं परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका बैठकीत म्हटलं होतं,” असा दावा पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्ष मुस्लीम लीग (नवाज) चे खासदार अयाज सादिक यांनी केला आहे.

या प्रकारानंतर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या हवाली करताना शांततेसाठी हे पाऊल उचलल्याची हाकाटी पंतप्रधान इम्ररान खान पिटत होते. मात्र आता पुन्हा इम्ररान खान खोटेपणा समोर आला आहे. त्यांचा हा खोटेपणा पाकिस्तानच्या एका खासदाराने उघड केला आहे.

याचबरोबर, परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी घेतलेल्या संभाव्य हवाई हल्ल्यासंदर्भात बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते, असा दावाही खासदार अयाज सादिक यांनी केला आहे.

वाचा नेमकं काय आहे प्रकरण..
भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे गेल्यावर्षी विमान अपघातग्रस्त झाले आणि ते पाक अधिकृत काश्मीरमध्ये फसले गेले. तेथून त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले. अभिनंदन यांना मानसिकरीत्या त्रास देण्याचा पाकिस्तानने खूप प्रयत्न केला होता. अखेर १ मार्च रोजी पाकिस्तानला अभिनंदन यांना अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवावे लागले.

 

महत्त्वाच्या बातम्या
अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुखांचे पाय लटपटत होते; खासदाराचा दावा
एक वर्षानंतर अभिनंदनच्या सुटकेविषयी सत्य आले समोर; पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला
“मानलं पवार साहेब, महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.