राष्ट्रीय महामार्गाला काम पूर्ण होण्याआधीच भेगा, पंकजा मुंडेंची सूचना आणि गडकरींकडून कारवाईचे आदेश..

बीड । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दर्जेदार कामांसाठी ओळखले जातात. काम नीट झाले नाही तर ते संबंधीत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावतात. ते स्वतः कामाचा दर्जा बघतात. मगच पैसे देतात. यांच्या कामाचे कौतुक विरोधक देखील करत असतात. यामुळे ते सतत चर्चेत असतात.

आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने लगेच याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून ते कामासाठी किती तत्पर आहेत, हे दिसून येते.

पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. नितीन गडकरी यांना हे कधीही चालणार नाही. याची तात्काळ दखल घेतली जाईल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे लक्ष लागले होते.

याबाबत त्यांनी फोटो देखील पोस्ट केला आहे. गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तरात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामे देखील लवकरात लवकर केली जातील.

कामे चांगली झाली नाहीत, तर नितीन गडकरी कंत्राटदारावर कारवाई करतात त्यांना पैसे देत नाहीत. याची प्रचिती अनेकदा आली आहे. तसेच कामे रखडून देखील देत नाहीत. कामांना गती मिळाली पाहिजे, आणि रोडच्या कामात अनेक वेळा त्यांनी विक्रम देखील नोंदवला आहे.

यामुळे गडकरी सतत चर्चेत असतात. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीच तक्रार केल्याने त्यांनी लगेच दखल घेतली. यामुळे आता या रस्त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करावी लागणार आहे. मात्र कंत्राटदारावर कारवाई देखील केली जाईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.