दोन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीला मागावे लागले ट्विटरवरून काम

बॉलीवूडमध्ये खुप कमी अभिनेत्र्या ह्या बोल्ड आणि बिंदास आहेत. खुप कमी अभिनेत्र्या काळाच्या पुढे जाणारे निर्णय घेतात.

बॉलीवूडमध्ये देखील अशी एक अभिनेत्री आहे. जिने काळाच्या पुढे जाणारा निर्णय घेतला. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयाचा तिच्या करिअरवर परिणाम झाला.

जाणून घेऊया अशाच एका अभिनेत्रीबद्दल जी पहिल्यांदा आई झाली. तेव्हा लोकांनी तिला नावे ठेवली. पण जेव्हा ती दुसऱ्यांदा आई झाली, तेव्हा लोकांनी तिला आनंदाने स्वीकारले.

नीना गुप्ता बॉलीवूडची बिंदास आणि नीडर अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयासाठी दोन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

नीना गुप्ता यांचा जन्म ४ जुलै १९५९ ला दिल्लीमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाले. पण नीना यांना अभिनयामध्ये आवड होती. त्यामूळे त्यांनी मुंबईला यायचा निर्णय घेतला.

नीना गुप्ता यांनी ‘गांधी’ चित्रपटापासून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर १९८२ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामध्ये नीना यांनी काम केले. या चित्रपटातील त्यांची भुमिका खुप प्रसिद्ध झाली.

या कालावधीमध्ये नीनांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक बदल झाले. नीना आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांचे प्रेम जुळले. या दोघांच्या नात्याची त्या काळात खुप चर्चा झाली होती.

पण तरीही या दोघांचे नाते कायम होते. १९८८ मध्ये नीना गुप्ता गरोदर राहिल्या होत्या. पण व्हिवीयन रिचर्डस अगोदरपासून विवाहीत होता. त्यामूळे त्यांनी नीनाशी लग्न करण्यास नकार दिला.

या नकारामूळे नीना निराश झाल्या नाहीत. त्यांनी या बाळाला जन्म द्यायचे ठरवले. १९८९ मध्ये नीना यांनी मसाबा गुप्ताला जन्म दिला आणि एकटीने तिचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.

यासोबतच नीना यांचे अभिनय देखील सुरूच होते. खलनायक चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यासाठी नीना यांचे खुप कौतूक करण्यात आले.

नीना गुप्ता यांना ‘वो छोरी’ आणि ‘बाझार’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर नीना यांनी टेलिव्हिजनवर श्रीमान श्रीमती, भारत एक खोज अशा मालिकांमध्ये काम केले आहे. टेलिव्हिजनवर देखील नीना यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली.

नीना काही दिवस चित्रपटसृष्टीपासून लांबच होती. कारण नीना यांना चित्रपटांच्या चांगल्या ऑफर येते नव्हत्या. त्यामूळे नीना यांनी सोशल मिडीयावर काम मागण्यास सुरुवात केली.

नीना यांनी एक ट्वीट केले की, ‘मी मुंबईत आहे. एक चांगली अभिनेत्री आहे आणि चांगल्या भुमिकांची वाट पाहत आहे.’ नीनांच्या या ट्वीटने सर्वांनाच धक्का बसला. पण नीना यांना याचा फायदा देखील झाला.

नीना यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. नीना यांनी या चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. नीना यांनी बधाई, मुल्क अशा चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांच्या या चित्रपटातील अभिनयाचे सर्वांनीच कौतूक केले. आज नीना यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.