कंगणाचा पुन्हा कांगावा! नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विट करत म्हणाली….

अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ट्विटरवर प्रत्येक विषयावर कंगणा आपलं मत मांडतच असते. राजकीय नेत्यांवर, अभिनेते, अभिनेत्रींवर कंगणा रणौत नेहमी टिका करत असते. कंगना आता पुन्हा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नथुराम गोडसे यांच्यावर तिने ट्विट केले आहे. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टिका केली तर काहींनी कंगणाचे विचार योग्य असल्याचं म्हटले आहे.

ट्विट करत कंगणाने नथुराम गोडसे यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने लिहिले की, प्रत्येक कथेचे तीन पैलु असतात, एक आपला आहे, एक माझा आहे आणि एक सत्य आहे. चांगला कलाकार कोणाला बांधील नसतो किंवा तो काही लपवतही नाही. त्यामुळे आपली पुस्तके निरूपयोगी आहेत. पुर्णपणे दिखावा करणारी.

 

कंगणा दिसणार इंदिरा गांधींच्या भुमिकेत

कंगणा रणौत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. याबाबत तिने ट्विट केले आहे. “इंदिराजी माझ्यासाठी एक आयकॉनिक महिला आहेत. त्यांच्या आयुष्यावरील चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार आहे.”

तसेच “त्यासाठी मी फोटोशुट केले आहे. मी ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटले नव्हते की मी कधी इंदिरा गांधीची भूमिका करेल.” असे ट्विट कंगणाने केले आहे. पण सध्याच्या मोदी सरकारचे समर्थन करणारी कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसोबत न्याय करू शकेल का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
अण्णा हजारेंची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी दिला मोदी सरकारला इशारा, म्हणाले…
बजेटच्या दिवशी स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, दहा ग्रॅमवर इतक्या रुपयांची सूट
क्रुरतेचा कळस! आईची ह.त्या करून मुलाने अंगणातच जाळला मृतदेह, त्यावरच भाजून खाल्ली कोंबडी
केंद्र सरकारचा नवीन निर्णय; अभ्यासात ‘ढ’ असणारी मुलेसुद्धा दहावी बोर्ड परिक्षेत पास होणार

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.