Share

नाशिकमध्ये मशिदीच्या १०० मीटर आवारात हनुमान चालिसा लावण्यास बंदी, पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे. आता नाशिक(Nashik) जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.(nashik police commisioner giver this order)

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आता परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, कोणत्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजाणाच्या वेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही. तसेच हनुमान चालिसा लावायची असल्यास पोलीस आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

अजाणाच्या १५ मिनिटं आधी हनुमान चालिसा लावता येईल, असे देखील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे. जर कोणी या आदेशाचे पालन न केल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रतेच्या संदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी तीव्रतेबाबत काही बंधने घातली आहेत. शहरातील प्रत्येक ठिकाणी आवाजाची पातळी किती असावी, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली तयार केली आहे.

नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांना या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढावेत, असं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरे अडचणीत, भोंगे उतरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाच नाही, ‘ती’ माहिती निघाली खोटी
आजपासून बँकांच्या कामकाजात मोठा बदल, ‘ही’ असणार उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ
हस्तमैथुन करणं पडलं महागात, घडलं असं काही की तरुणाला करावं लागलं रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now