मुस्लिम कुटुंबाच्या घरी दरवर्षी येतो बाप्पा! बाप्पामुळेच पुत्ररत्न लाभल्याचा रेहमानचा दावा

जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे. त्यामुळे समाजात अजूनही जातीभेद पाळला जातो. कोणताच धर्म हा जात पताची शिकवण देत नाही. अशीच एक घटना आहे ती म्हणजे नाशिक येथील पुरणगाव मधील एका मुस्लिम कुटुंबाने गणेशो्सव साजरी करत जाती-पातीवर मात करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

फोटोग्राफी हा मूळ व्यवसाय असलेले रेहमान याचं बालपण पुरणगाव येथे गेलं. रेहमान शेख यांची मूळ भाषा ही मराठी आहे. हिंदी त्यांना फारस जमत नाही. रेहमान यांचं लग्न झालं आहे.

त्यांना दोन मुली देखील आहेत. बहिणींसाठी एखादा भाऊ असावा यासाठी गावातील उजव्या सोंडीच्या सिद्धिविनायक मंदिरात आपल्याला मुलगा होऊदे म्हणून नवस केला होता. गणपती बाप्पांनी त्याची विनंती ऐकली आणि त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला.

पुत्र प्राप्तीनंतर त्याला गणपती बाप्पावर अतुट विश्वास आणि श्रद्धा जडली. त्यामुळे दरवर्षी त्याने आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रेहमानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते.

तसेच ही परंपरा अखंडपणे सुरू राहील असे तो आनंदाने सांगतो. रेहमानला गणेशाची स्थापना करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली. घरात गणेश स्थापना करण्यासाठी आपल्याला समाजाकडून, घरातल्या किंवा वडिलधाऱ्यांकडून कोणीच विरोध केला नाही.

मी सर्वधर्म समभाव समजतो, कोणी कुठेही प्रार्थना करा मला जे आवडले ते मी केले, देव कुठलाही असो तो सर्वत्र सारखाच आहे, अशी भावना रहेमान शेख व्यक्त करतो.

 

महत्वाच्या बातम्या
ज्यांच्या चालण्याने सुद्धा जमीन हादरायची ते हत्ती परत येणार, १० हजार वर्षांपूर्वी या हत्तींची प्रजाती झाली होती विलुप्त
उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन इकतेच लोकप्रिय, जावेद अख्तरांकडून कौतुकाचा वर्षाव
प्रवीण दरेकरांना एवढी मस्ती कशाची आलीय? माफी मागा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही
तारक मेहता फेम अभिनेत्याचा भीषण अपघात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.