सात पिढ्या बसून खातील इतकं कमवलयं, तर घाबरता कशाला?”, नसीरूद्दीन शाहांनी बॉलिवूडला सुनावलं

कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशातून आणि देशाबाहेरील अनेक मोठ्या व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतरही भारतातील मोठ्या अभिनेत्यांनी शेतकरी आंदोलनावर तोंड उघडलं नसल्याने बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाहा यांनी आक्रमक होत खडेबोल सुनावले आहेत.

पंजाबचा प्रसिध्द गायक जॅझी बी याने नसीरूद्दीन शाहा यांचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये ते शेतकरी आंदोलनावर भाष्य करत शेतकऱ्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. व्हिडिओत जॅझी बी यांनी ‘हाच खरा मर्द’ असं कॅप्शन लिहलं आहे.

 

 

नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं की, “ आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मोठमोठे लोक शांत बसलेत, त्यांना खुप गमावण्याची भीती वाटतेय. अरे भाई… जर तुम्ही इतकं धन कमवून ठेवलयं की तुमच्या सात पिढ्या घरी बसून खाऊ शकतील, तर किती गमवाल?” तसंच शांत राहणं म्हणजे अन्याय करणाऱ्यांना समर्थन देण्याइतकाच मोठा गुन्हा आहे. असं अभिनेते नसीरूद्दीन शाहा यांनी म्हटलं आहे.

म्हत्वाच्या बातम्या-
आरारारा राडा! १०० कोटी घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’
बाबो! शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी रिहानाला मिळाले तब्बल १८ कोटी रूपये
दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केलेली १८ वर्षांची ग्रेटा आहे तरी कोण?

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.