होणाऱ्या नवऱ्याने उडवली देशाची थट्टा, संतापलेल्या अभिनेत्रीने थेट लग्नच मोडले; म्हणाली देश व धर्म प्रथम

एका ट्विटमुळे किंवा ब्लॉगमुळे लग्न मोडल्याचे आपण कुठे पहिले आहे का? पण हो असे घडले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासीरने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत त्याने केलेल्या ट्विटमुळे लग्न मोडले आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन देशांच्या वादात तिच्या होणाऱ्या नवऱ्याने भाग घेतला होता. तिचा होणार नवरा आणि ब्लॉगर ख्रिश्चन बेत्झमान याने त्याच्या ब्लॉगवरून पाकिस्तानची थट्टा उडवली तेव्हा तिने हा निर्णय घेतला आहे.

त्याने त्याच्या ब्लॉगमध्ये पाकिस्तानचा तिसरा देश म्हणून पण उल्लेख केला होता. ख्रिश्चन हा एक जर्मन ब्लॉगर आहे. त्याच्या पोस्टवर सध्या खूपच वादग्रस्त विषयांवर तो लिहित असतो. यावेळी त्याने ब्लॉगमध्ये प्रार्थना केली आहे.

तो त्या प्रार्थनेमधून म्हणतो की, यावेळी प्रार्थना केल्यास फायदा होणार नाही. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवलेल्या पाकिस्तानींवरही ख्रिश्चन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ख्रिश्चनाच्या मते, जेव्हा आपण आपल्या स्वत: च्या देशाचा नाश करीत असता तेव्हा आपल्यासाठी आणि आपल्या लोकांना मदत करण्यास सक्षम नसतानाही इतरांना वाईट वाटू देऊ नका.

रविवारी झोयाने हा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्न न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, माझ्या धर्माबद्दल दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.

झोयाने लिहिले, ‘ख्रिश्चन संस्कृती, माझे देश आणि माझ्या लोकांनो, ज्याने अचानक भूमिका बदलली, माझ्या धर्माबद्दल दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे मला हा कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले.’ झोयाच्या या ट्विटला ख्रिश्चनने पण प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या
इंडिअन आयडल १२’: षण्मुख प्रियासह तिच्या आईचे ट्रोलसला धडधडीत उत्तर, मायकल जाक्सनच उदाहरण देत म्हणाल्या..

राज्य झोपेत असताना सरकार पडणार; चंद्रकांत पाटील यांनी केला गौप्यस्फोट

भाऊ कदम यांची लाडकी लेक दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देते टक्कर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.