महिलांच्या खात्यात नारी शक्ती योजने अंतर्गत जमा होणार दोन लाख? जाणून घ्या काय आहे सत्य

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक यूट्यूब व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात २ लाख २० हजार रुपये जमा करणार आहे.

तसेच २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज व्याजाशिवाय, हमीशिवाय आणि सुरक्षेशिवाय देण्यात येणार आहेत. पण आता भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल, पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल मेसेजमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळली आहे.

व्हायरल व्हिडिओद्वारे केले जाणारे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे एजन्सीला आढळले आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. पीआयबीने ट्विट करून हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाहीये, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

एका युट्युब व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांना २ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम देईल. तसेच २५ लाखांपर्यंत कर्ज देत आहे: पण हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर हँडलद्वारे सरकार वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजबद्दल लोकांना सावध करते आणि सत्य सांगत असते. फेक न्यूजचा सामना करण्यासाठी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने केंद्र सरकारच्या मंत्रालये, विभाग आणि योजनांबद्दलच्या बातम्यांची पडताळणी करण्यासाठी PIB फॅक्ट चेक टीम नावाचे ‘फॅक्ट चेकिंग युनिट’ स्थापन केले आहे.

PIB फॅक्ट चेक टीमने तपासलेल्या कोणत्याही मेसेजची सत्यता देखील तुम्ही मिळवू शकता. या अंतर्गत माध्यमांमध्ये सरकार आणि सरकारी योजनांशी संबंधित बातम्यांची सत्यता जाणून घेतली जाते. तुमच्याकडेही काही संशयास्पद बातमी असेल तर तुम्ही ती factcheck.pib.gov.in किंवा व्हॉट्सऍप क्रमांक +९१८७९९७११२५९ किंवा ईमेल: [email protected] वर पाठवू शकता. याबाबत अधिक माहिती पीआयबीच्या pib.gov.in या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मोदीच नाही, तर राजीव गांधींनाही झुकावे लागले होते शेतकऱ्यांसमोर; वाचा १९८८ चा ‘तो’ किस्सा
मरण्याआधी ‘ही’ गोष्ट करतो माणूस; अनेक मृत्यू पाहीलेल्या नर्सच्या खुलाश्याने उडाली खळबळ
नवरा बायकोची भन्नाट आयडीया, एकमेकांचे कपडे वापरून केली ७७ हजारांची बचत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.