Share

Narinder Kaur : कार्यकर्त्याने प्रचार करता करता थेट महीला आमदारलाच पटवली! लग्नानंतर आता आमदार म्हणतेय….

Narinder Kaur

Narinder Kaur : पंजाबमधील संगरूरमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर यांनी लग्नगाठ बांधली आहे. २८ वर्षीय नरिंदर यांनी लग्नाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला आहे. त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता मनदीप सिंग लाखेवाल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.(Narinder Kaur, Punjab, Aam Aadmi Party, Mandeep Singh)

पटियालाच्या रोडेवाल गावात असलेल्या गुरुद्वारा साहिबमध्ये हा लग्नाचा सोहळा पार पडला आहे. लग्नानंतर नरिंदर कौर यांनी पत्रकारांना सांगितले की, आम आदमी पक्षाने सामान्य कुटुंबातील उमेदवाराला निवडून आणून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळेच एक सामान्य कुटुंब असल्याने आम्ही साधेपणाने लग्न केले आहे.

पुढे आमदार नरिंदर म्हणाल्या की, राजकीय जबाबदारीसोबतच आता कौटुंबिक जबाबदारीही वाढली आहे, पण ती वाटण्यासाठी जोडीदारही सापडला याचा आनंद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नरिंदर कौर आणि मनदीप सिंग लाखेवाल यांच्या गावात फक्त २ किलोमीटरचे अंतर आहे.

मनदीप सिंग हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मीडिया प्रभारीही आहेत. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनदीप सिंग यांनी नरिंदर कौर यांच्या बाजूने निवडणूक प्रचारातही भाग घेतला होता. २८ वर्षीय नरिंदर हे पंजाब विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत.

Narinder Kaur

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर मतदारसंघातून त्यांनी ३८ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने आपली पहिली निवडणूक जिंकली. नरिंदर यांनी संगरूर मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला होता.

नरिंदर कौर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला, जे काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. त्याचवेळी, या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे विनरजीत सिंग गोल्डी आणि भारतीय जनता पक्षाचे अरविंद खन्ना यांनीही नरिंदर यांच्याविरुद्ध लढत दिली.

महत्वाच्या बातम्या
Shares: बॅंक शेअर्समध्ये गुंतवणूक कराल तर व्हाल मालामाल, तज्ञ दीपन मेहतांनी दाखवला विश्वास, म्हणाले…
Rape: विद्यार्थिनीने धक्का दिला म्हणून सिनीअर्सने तिच्यावर केला बलात्कार, शाळेने प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न
Neelkanth Bhanu: डोक्याला दुखापत झाल्याने १ वर्ष अंथरूणाला खिळून राहिला, आता उभी केली १० कोटींची कंपनी

ताज्या बातम्या इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now