बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; पक्ष सोडताना केले गंभीर आरोप

मुंबई : माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाणार शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट झालेली नाही, असेही त्यांनी म्हंटले.

तसेच पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, ‘मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत, असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. नरेंद्र पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, पक्ष सोडताना केले गंभीर आरोप

शिधावाटप दुकानांवरील वॉच आता होणार अधिक कडक; दुकानदाराची करता येणार तक्रार

तान्हूल्या वामिकाला पाठकुळी घेऊन अनुष्का विराटसोबत मैदानात; फोटो पाहून डोळे पाणावतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.