पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धूमाकूळ घातला आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येत रुग्ण सापडत आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

देशातील ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उस्थितीत संबंधित राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला होता. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहे, या हेतूने ही व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती.

बैठकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंड भरुन कौतूक केले आहे. कोरोनाशी लढा देण्यात मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या निर्णयामुळे यश येत आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जिल्ह्याला फायदा झाला आहे. प्रशासन थेट आता ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहचले आहे. ग्रामपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक. पोलिस पाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. रुग्णांना होम क्वारंटाईन न करता त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचे, डॉ भोसले यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्स संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी डॉ. राजेंद्र भोसले यांचे कौतूक केले आहे. तसेच पोपटराव पवार यांचेही कौतूक केले आहे.

दरम्यान, कोरोनामुक्तीसाठी गावांनी राबवलेल्या यशस्वी प्रयोगांची देशपातळीवर अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

एअर होस्टेसचा आशिक झाला नवाजुद्दीन, फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद; पहा व्हिडीओ
“पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते सगळं करणार”
कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.