“नरेंद्र मोदी मला थांबून म्हणतात, कैसे हो भाई, यालाच म्हणतात सत्ता, पॉवर”

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत हे सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली होती. यामुळे ते अजून चर्चेत आले. भाजपशी ते थेट पंगा घेतात. भाजप नेतृत्वावर टीका करताना ते कधी मागे पुढे बघत नाहीत.

आता देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर.

सुरुवातीचा काळ वेगळा होता, तेव्हा आम्ही हातात मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची. कारण त्यांना कळायचे हा शिवसैनिक आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे पुढे काही दिवसांनंतर गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचे प्रोटेक्शन आहे. यावेळी राऊत यांनी नारायण यांना देखील टोला लगावला.

राणे हे पहिले शिवसैनिक आहेत, शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी तो बदलत नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असेही राऊत म्हणाले.

सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. संजय राऊत अहमदनगर दौऱ्यावर होते, यावेळी ते बोलत होते.यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार’

..वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.