रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत चाललेला आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती.

आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर त्यांच्या आई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, रश्मी ठाकरे यांना २३ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं.

त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे ११ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

आदित्य ठाकरेंनाही कोरोना
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: 20 मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या 

काका ऋषी कपूरसोबत करिश्मा कपूरला करायला होता रोमान्स; पण आजोबांनी दिला नकार

पोलिसांनी लोकांना दिलेली शिक्षा बघून आनंद महिंद्राही घाबरले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का? FIRशिवाय सीबीआय चौकशी कशी? परमबीरसिंगांना कोर्टाने फटकारले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.