‘शेतकऱ्यांची माफी मागून नरेंद्र मोदींनी दाखवली नम्रता; काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतूक

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रकाश पर्वानिमित्त तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘पीएम मोदी शेतकऱ्यांची माफी मागून आपली नम्रता दाखवत आहेत, यात कोणताही अहंकार नाही.’ ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

पंजाब, हरियाणा आणि इतर अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. आज त्यांची मेहनत आणि संघर्ष कामाला आला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, गुरुनानक जयंतीपूर्वी मोदी सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा उघडून शीख यात्रेकरूंना भेट दिली आहे. शीख पंथातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याआधी शुक्रवारी अमरिंदर सिंग यांनी कृषी कायद्यांबाबतच्या निर्णयाबद्दल मोदींचे आभार मानले. माजी मुख्यमंत्र्यांच्या मीडिया सहाय्यकाने ट्विट केले की, “पंजाबमध्ये आपल्या सर्वांसाठी हा मोठा दिवस आहे. मी एक वर्षाहून अधिक काळ केंद्रासमोर हा मुद्दा मांडत होतो आणि नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या अन्नदाताचा आवाज ऐकण्याची विनंती केली. त्यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आमच्या समस्या समजून घेतल्याबद्दल खरोखर आनंद झाला.

ते म्हणाले की, हे केवळ शेतकर्‍यांना मोठा दिलासाच नाही तर पंजाबच्या प्रगतीचा मार्गही मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र (सरकार) सोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. मी पंजाबच्या जनतेला वचन देतो की जोपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.