Share

Ayodhya Ram Mandir Flag: प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या कळसावर भगवा फडकला, दैवी उर्जेने नरेंद्र मोदी सद्गतित; अंगावर शहारे आणणारा Video

Ayodhya Ram Mandir Flag: अयोध्या (Ayodhya) येथे आज इतिहासात नोंद राहील असा सोहळा पार पडला. नव्याने उभारलेल्या राम मंदिराच्या (Ram Mandir) शिखरावर दिमाखात भगवा धर्मध्वज चढवण्यात आला. सकाळी विधीवत पूजा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संघाचे प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे धर्मध्वजाचे पूजन केले. सूर्याची प्रतिमा आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह असलेल्या या विशाल ध्वजाकडे हजारो भाविकांचे लक्ष लागून राहिले होते.

ध्वजारोहणासाठी विशेष यंत्रणेद्वारे बटन दाबताच धर्मध्वज कळसाच्या दिशेने वर सरकू लागला. प्रचंड वाऱ्याचा वेग असतानाही हा ध्वज अचूक मार्गक्रमण करत 191 फूट उंचीवर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर स्थिरावला. उपस्थित भक्तगण मंत्रोच्चारांत हरखून गेले.

या क्षणाचं थरारक दृश्य पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात दैवी भावनेची उर्मी ओसंडून वाहताना दिसली. कळसावर धर्मध्वज पोहोचताच त्यांच्या जोडलेल्या हातांना हलका कंप आला, ज्यामुळे ते क्षणभर स्थिर उभे राहून भावनांनी भारावले. उपस्थित नागरिकही हा प्रसंग अनुभवताना पूर्णपणे मोहित झाले.

धर्मध्वज फडकविल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, “सत्याचाच विजय होतो; सत्य हेच धर्मस्वरूप आहे.” त्यांनी सांगितले की हा धर्मध्वज देशाला नवी प्रेरणा देईल. गरीबी, भेदभाव आणि दुर्बलता नसलेल्या समाजाची निर्मिती करणे हेच राममंदिराने दिलेले तत्वज्ञान आहे. हा ध्वज त्याच मूल्यांचे प्रतिक ठरेल, असे ते म्हणाले.

राम मंदिरावरील रामध्वजाचं वैशिष्ट्ये काय? 

161 फूट उंचीच्या शिखरावर बसवलेला 42 फूट उंच धर्मध्वज
एकूण उंची जमिनीपासून 191 फूट
केशरी रंग, 11 फूट रुंदी, 22 फूट लांबी
स्वयंचलित यंत्रणेतून बटन दाबताच ध्वज शिखरावर पोहोचतो.

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now