महाराष्ट्र कोरोनाशी चांगला लढतोय; पंतप्रधान मोदींनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून केले कौतूक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तसेच आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे.

कोरोना लस घेण्यासाठी आधी कोविन या ऍपवर रजिस्ट्रेशन करावे लागते. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविन ऍपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. कोविन ऍपमध्ये काही त्रुटी आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चे ऍप्लिकेशन वापरु द्यावे, असे म्हटले आहे.

आता हे पत्र पाठविल्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला आहे. फोनवर पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी स्वतंत्र ऍपबद्दलही चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे. पण याबबत अजून कुठलिही माहिती आलेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. महाराष्ट्र कोरोनाविरोधात चांगली लढाई लढत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. दुसऱ्या लाटेशी लढताना महाराष्ट्रा खुप चांगले काम करत आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांसोबत चर्चेवेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनबाबत विशेष बळ मिळावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच उपाययोजनांची माहितीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्राने तयारी करुन ठेवली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला सुरुवातीपासूनच मार्गदर्शन करत आहे. त्याचा चांगला उपयोगही महाराष्ट्राला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्य केल्या आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोसळणार धो धो पाऊस; या जिल्ह्यात पावसाचा हवामान विभागाने दिला अंदाज
केस गळाले, चेहऱ्यावरचे तेजही हरपले, कॅन्सरमुळे वाईट हाल झालेत अनुपम खेरच्या पत्नीचे; पहा फोटो
जाणून घ्या किती मानधन घेतात ‘इंडिअन आयडल १२’ चे परीक्षक नेहा, विशाल आणि हिमेश रेशमिया?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.