Share

ठाकरे सरकार धोक्यात? थेट पंतप्रधानांनीच दिले मिशन महाराष्ट्राचे संकेत; म्हणाले…

narendra-modi-

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकाणात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सत्ताधारी नेत्यांच्या मागे ईडी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडून ईडीवर केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांच्यावर पलटवार केला आहे. (narendra modi on thackeray government)

आता चार राज्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या मुख्यलयात विजय सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करुन मिशन महाराष्ट्राचे संकेत दिले आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन पंतप्रधानांनी महाविकास आघाडी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी की नको? आपल्या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात, भ्रष्टाचारींच्या प्रती द्वेष आहे. देशाच्या कमाईतून लुटून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची ओळख बनली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भाजपने २०१४ मध्ये प्रामाणिक सरकारचे वचन देत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१९ ला नागरिकांनी पुन्हा विश्वास दाखवला. मोदी सरकार भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करु शकतं, असा नागरिकांचा विश्वास आहे. पण आज निष्पक्ष संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात. तेव्हा हे लोक त्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तपास यंत्रणांना रोखण्यासाठी हे लोक आपल्या इकोसिस्टिमसोबत मिळून नवनवे मार्ग शोधतात. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करायचा, त्यानंतर तपासही करु द्यायचा नाही.तपास सुरु झाला, तर यंत्रणांवर दबाव आणायचा, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

हे लोक भ्रष्टाचारावर कारवाई होताच धर्म, जाती, प्रदेशचा रंग देतात. कोणच्या माफियाविरोधात कोर्ट काही निकाल सुनावते, तर हे लोक त्याचा संबंध जातीपातीशी जोडतात. मी सर्व संप्रदायांना विनंती करतो की अशा प्रवृत्तीच्या लोकांना समाजापासून दूर करा, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’ विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
तब्बल 342 मते मिळवणारे गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार
शिवसेनेला नोटापेक्षा कमी मतं का मिळाली? संजय राऊत म्हणाले, भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now