कोरोनामुळे भारताची जितकी अर्थव्यवस्था ढासळली आहे, त्यापेक्षा जास्त वेगाने ती सुधारतेय- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित आज सरदार धाम भवनचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या भवनाच्या माध्यमातून नोकरी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना हॉस्टेलची सुविधा मिळणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. मोदींनी कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिकस्थितीवरही भाष्य केले आहे.

सध्या जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे पुर्ण जगातल्या सर्वच देशांची आर्थिकस्थिती बिघडली आहे. भारतावरही याचा खुप मोठा परीणाम झाला आहे. पण कोरोनामुळे भारताची अर्थव्यवस्था जितकी थांबली होती आणि तितकीच ती रिकव्हर करत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी नरेंद्र मोदींनी अमेरिकेवर झालेल्या ९/११ या दहशतवादी हल्ल्यावरही भाष्य केले आहे. आपण सगळ्यांनी या दहशतवादी हल्ल्यांना विसरले नाही पाहिजे. आजच्याच दिवशी गेल्या वीस वर्षांपुर्वी अमेरिकवर दहशतवादी हल्ला झाली होती, ज्यामध्ये ३ हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी योजनेच्या माध्यमातून युवकांच्या कौशल्य विकासातून स्वावलंबी बनवले जात आहे. यासह, बाजारात कुशल लोकांची मागणी असेल, तरुणांना जागतिक जगासाठी तयार करा, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

गुजरातमधील लोकांमध्ये उद्योजकतेचा जन्मजात गुण आहे. तरुणांना जागतिक व्यासपीठाशी जोडण्यासाठी सरदारधाम सर्वतोपरी प्रयत्न करतो. व्हायब्रंट गुजरात इन्व्हेस्टर्स समिट हा प्रयत्न पुढे नेईल. गुजरातच्या प्रतिभेला केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर जगभरात ओळखले जात आहे. गुजरातचे तरुण जिथे जिथे राहतात तिथे देशाचे हित त्यांना प्राधान्य देते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

१४१ वर्षांचा इतिहास असलेल्या फोर्ड कंपनीने भारतातून का गुंडाळला बाज्याबोजा?
17 महिन्यांच्या अयंशच्या आजाराबद्दल समजताच अमिताभ झाले भावुक, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी लगेच दिले पैसे
फक्त पैसे कमावण्यासाठी BCCI ने धोनीला टिम इंडीयात घेतलय; वाचा पडद्यामागचे सत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.