नरेंद्र मोदी आईला भेटताना आम्हाला जवळ येऊ देत नाहीत; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितले होते. मात्र पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचे तिकीट नाकारले आहे. काल भाजपाकडून उमेदवारांची घोषणा केली गेली. पण त्यात सोनल मोदी यांचं नाव कुठल्याच वॉर्डातून घोषित केले गेलेले नाही.

सोनल यांनी यावर बोलताना सांगितले की, ‘प्रल्हाद मोदी हे त्यांचे भाऊ आहेत, परंतू मी माझ्या कामावर तिकिट मागत आहे. मोदींनी कधी मिडीयासमोर सांगितले की, ही माझी पुतणी आहे, हा भाचा आहे, असा सवाल मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितले होते असे सोनल म्हणाल्या. मी भाजपाची सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला तिकीट देण्यात यावे असे मी भाजपाच्या निवड समितीला सांगितले होते. मोदींच्या नावामुळे मी चर्चेत आले. परंतू जर तिकिट दिले असते, मी सोनल मोदी आहे हे लोकांना समजले असते, असेही सोनल यांनी म्हंटले आहे.

याबाबत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारले असता, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. आणि नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा पक्षाचा निर्णय झाल्याचे म्हणाले. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारले गेल्याचे कळते आहे.

दरम्यान, सोनल मोदी ह्या मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहे. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. सोनल मोदी ह्या भाजपात काही काळापासून काम करतात.

महत्त्वाच्या बातम्या
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
३५ वर्षांपूर्वी माझ्या घरातील पंतप्रधान, मग घराणेशाही कुठेय? राहुल गांधींचा भाजपाला सवाल
‘१०० हून जास्त खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.