आज नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोणता मोठा निर्णय घेणार?

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनापासुन बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी देशवासियांना संबोधित करत होते. आजही म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण घोषणा करून देशातील जनतेला सूचना देऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आज मी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. मी माझ्या देशवासियांना एक संदेश देणार आहे. आपणही सामील व्हा.’

दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान खारखे नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संदेश देणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

भारतात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी बर्‍याच वेळा राष्ट्राला संबोधनले आहे. दरम्यान, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या , वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे. हे उपभोक्‍ता मूल्‍य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल. आज नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करतील हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

“ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे”; प्रविण दरेकरांनी लगावला टोला

फडणवीसांची कोंबड्यासारखीच अवस्था झालीये; राष्ट्रवादीची फडणवीसांवर बोचरी टिका

हेमामालिनीशी लग्न करायला परवानगी देताना धर्मेंद्रच्या पत्नीने टाकली होती ‘ही’ विचीत्र अट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.