“निवडणूक आल्यावर पाकिस्तानशी युद्ध करतात, पुलवामात स्वतःच आपल्या सैनिकांचा जीव घेतात”

 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा रविवारी पार पडला आहे. मतदानाची पुढची तारीखजवळ येत असताना सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी आरोप प्रत्यारोपणाचा खेळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तसेच तृणमूल काँग्रेस, भाजप प्रचार सभा घेत आहे. अशात एक पक्ष दुसऱ्या पक्षावर जोरदार टीका करत आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनारपूरच्या प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पुलवामाला बघून देशप्रेम दाखवतात, निवडणूक आल्यावर पाकिस्तानशी युद्ध करतात, पुलवामात स्वतःच आपल्या सैनिकांचा जीव घेतात, हे आहे यांचे खरे रूप आणि चालले आम्हाला देशप्रेम शिकवायला, असे धक्कादायक विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदार संघापैकी दोन टप्प्यामध्ये ६० मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामुळे आता तृणमूल काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच झडत पाहायला मिळत आहे, अशात दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडताना दिसून येत आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनारपूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी, ममता जर वाराणसीमधून निवडणूक लढतील, तर तिथे साधू संत भेटतील. इथे तर त्यांना जय श्री रामच्या नाऱ्यावरून चीड येते, तिथे तर त्यांना सगळीकडेच हरहर महादेव ऐकायला मिळेल, मग तिथे ममता काय करतील? अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.