मी संसदेतील चांगला मित्र गमावला; राजीव सातव यांच्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

मुंबई  | कॉंग्रेसचे मोठे नेते खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. पण अखेर राजीव सातव ही लढाई हारले आहेत. पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँंग्रेसमधील नेत्यांनी राजीव सातव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच विविध पक्षातील नेत्यांनीही सातव यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत श्रध्दांजली वाहिली आहे. राजीव सातव यांच्या जाण्याने संसदेतील चांगला मित्र गमावला आहे. राजीव सातव आगामी काळातील सक्षम उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या कुटूंबीय, मित्र, समर्थक यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती असं ट्विट करत मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

राजीव सातव हे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे बडे नेते होते. दिल्लीत कॉंग्रेस पक्षात त्यांचे चांगलेच वजन होते. राहूल गांधी यांच्या ते खूप जवळचे होते. २०१४ च्या मोदी लाटेत राजीव सातव शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत खासदार झाले होते.

राजीव  सातव यांच्यावर उद्या सकाळी  मुळगावी हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती काँग्रेस नेते मंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

दरम्यान  शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव हे तु काय केलंस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापुर्वीच व्हिडिओ कॉलवर आपण हाय हॅलो केले.. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
शहीद जवानाच्या कुटुंबासाठी गावाने दाखवली कृतज्ञता; एका रात्रीत उभे केले १ लाख ९१ हजार
बिग ब्रेकींग! कॉंग्रेसचे मोठे नेते राजीव सातव यांचे पुण्यात निधन
नागपुरात भोंदुबाबाचा पर्दाफाश; नागीण डान्स करून कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
देवाकडे जास्त बघत नाही, आईकडे बघतो; आईच्या आठवणीत जयंत पाटील भावूक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.