मोदींची हातचलाखी! सामान्य माणसाच्या खिशातून २२५ रुपये काढून त्याला दिले फक्त १० रुपये

 

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांचे पूर्ण अर्थचक्रच बिघडत चालले आहे. असे असताना सिलेंडरच्या दरात १० रूपयांनी कपात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षभरात २२५ रुपये दर वाढवण्यात आला आहे. असे असताना आता १० रुपयांनी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या चालाखीमुळे गृहिणींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

लॉकडाऊन काळात अनेक लोकांचे रोजगार गेले होते, त्यामुळे आधीच संकट उभे राहिले होते, अशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आल्यामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले होते.

गेल्यावर्षभरात २२५ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती, तर ४ फेब्रुवारीला सिलेंडरच्या किंमतीमध्ये २५ रुपये वाढले होते, तसेच १५ फेब्रुवारीला पुन्हा ५० रुपये वाढले. पुढे २५ फेब्रुवारी आणि १ मार्चला पुन्हा २५ रुपयांनी किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, मागील काही महिन्यात झालेली भाववाढ आणि त्यानंतर केवळ १० रुपयांनी सिलेंडरच्या दरात केलेली कपात नक्कीच दिलासादायक नाही, अशा प्रतिक्रिया गृहिणींनी दिल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.