देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर काॅंग्रेसचा ताप वाढला; मोदींचा हल्लाबोल

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त लोकांनी राज्यांमध्ये कोरोना लसीकरण महा अभिनयात सहभाग घेतला होता. त्यादिवशी बिहारमध्ये जास्तीत जास्त कोरोना लसीचे डोस दिले असून पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे.

शुक्रवारी रात्री ११.२० पर्यंत २ कोटी ३७ लाख ७३ हजार कोटी ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात दिले गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी १३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

त्यानंतर आज पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोव्यातील आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी लसीकरणच्या विक्रमावरुन विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिसीद्वारे संवाद साधला त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री देखील संवाद परीषदेत सामील होते. यावेळी मोदी म्हणाले, गोव्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला लसीचा एक डोस मिळाला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेचे अभिनंदन, असे मोदींनी म्हटले आहे.

तसेच मी ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यास राजकीय संतुलनही बिघडते. पण मला जाणून घ्यायचं आहे की काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांनी लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी काही लोकांना त्रास झाला आहे.

पण हे मी पहिल्यांदाच बघतोय की अडीच कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरु झाला आहे. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का? असे मोदींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

राम-लखन चित्रपटातील या अभिनेत्रीने पार्टीमध्ये कापून घेतली होती हाताची नस, किस्सा वाचून धक्का बसेल
नक्की चाललंय काय? शिवसेना युतीचे संकेत देत असताना देवेंद्र फडणवीस- जयंत पाटलांचा एकाच गाडीत प्रवास
पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून अमिताभ बच्चनने मागितली क्षमा; म्हणाले, पैसे भेटतात म्हणून करावी लागते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.