“नरेंद्र मोदीच देशातले कोरोनाचे सुपर स्प्रेडर“; इंडीयन मेडीकल असोसिएशच्या उपाध्यक्षांनी सुनावले

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरीकांवर निर्बंध लावले आहे.

आता देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडीकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हटले आहे. याबाबत द ट्रेब्युने वृत्त दिले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना, राजकीय सभा घेणे, कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनाची सहमती दिल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे सुपर स्प्रेडर पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे, डॉ. नवज्योत दाहीया यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेतले. त्यांनी कोरोनाचे सर्च नियम मोडले आहे, असे डॉ. नवज्योत यांनी म्हटले आहे.

२०२० मध्ये कोरोनाची पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यावेळी यासंदर्भातील उपाययोजना करुण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लाखो लोकांना एकत्र करुन मोदींनी सभा घेतली, असे डॉ. नवज्योत यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही देशाची आरोग्य व्यवस्था डळमळत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतले नाही, असेही डॉ. नवज्योत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझे काय व्हायचे ते होऊद्या, मात्र मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचे?’
बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन
जास्तीची हाव न ठेवता ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.