आत्मनिर्भर भारत: चीनी अँप्सवर बंदी घालत मोदींनी देशवासियांना दिले ‘अँप चॅलेंज’, म्हणाले…

दिल्ली | भारताने चीनच्या ५९ अँप्सवर बंदी घातल्यानंतर आता मोदींनी भारताला या क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदींनी भारतातील युवकांना चॅलेंज दिले आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की ज्यांच्याकडे आयडिया असेल त्यांनी पुढे यावे. त्यांनी स्वावलंबी भारत इनोव्हेशन अँप चॅलेंज लाँच केले आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

आज मेड इन इंडिया अँप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. असेही ते म्हणाले आहेत. @Gol_MeitY आणि @AIMtolnnovate हे संयुक्तपणे हे चॅलेंज सुरू करत आहेत.

जर तुमच्याकडे काही विचार असतील काही चांगल करण्याचा दृष्टीकोन किंवा आयडिया असतील तर तुम्ही नक्की या चॅलेंजला जोडले जा. असे आवाहन मोदींनी केले आहे. त्यांनी ट्विटर आणि लिंक्डइनवर ही माहिती दिली आहे.

दरम्यान, भारताने ५९ चीनी अँप्सवर बंदी घातली आहे. दलवान खोऱ्यातील झालेल्या चीन आणि भारतीय सैनिकांच्या झटापटीनंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. आणि या अँप्सबद्दल काही तांत्रिक अडचणीसुद्धा होत्या त्यामुळे या अँप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.