“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”

मुंबई : ‘आज अनेक देशांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी लाईनमध्ये उभे राहतात. यापूर्वीची स्थिती निराळी होती. जगातील कोणत्याच नेत्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी फरकच पडत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता स्थिती बदलली आहे, असे म्हणत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची स्तुती केली.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. रविवारी ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘यापूर्वीच्या काळात प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं आणि म्हणूनच लोकं त्यांना देव मानू लागले होते. याचप्रकारे भविष्यात आपल्या लाडक्या पंतप्रधानांसोबतही तसंच होईल,” असेही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजप आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. नुकतीच तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रावत यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय सचिव, प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

इशान किशनचे दमदार अर्धशतक;  चर्चेत मात्र इशानच्या गर्लफ्रेंडचे हॉट फोटो

इशान किशनने त्याच्या तुफानी खेळीचे सांगितले ‘हे’ रहस्य

सुनीता गांधी: अशी शिक्षिका जी गरीब मुलांना तीस तासात बनवत आहे साक्षर, वाचा कसे…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.