‘सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळे सत्य समोर येईल’

 

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपुतने १४ जूनला वांद्रे येथील राहित्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र त्याने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही ठोस कारण मिळालेले नाही.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. तर काही राजकीय नेत्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव काही नेत्यांनी घेतले होते.

आदित्य ठाकरेंचे या प्रकरणात नाव घेतल्याने या वादात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. मात्र आता काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.

आता सीबीआयने सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी केली पाहिजे, असे मत बिहार भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी व्यक्त केले आहे.

इतकेच नाही तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही निखिल आनंद यांनी केली आहे. याबाबत निखिल आनंद यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

तसेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारांमध्ये आफरातफर केल्याचा आरोपही यावेळी निखिल आनंद यांनी केला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.