महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा; नारायण राणेंनी केली थेट गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर NIA कडून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अटक झाली आहे.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

त्यानंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. काहींनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे, तर भाजपा नेते नारायण राणेंनी थेट महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणीच गृहमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे.

राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे सांगितले. अमित शहा यांना दिल्लीत असतानाच तीन दिवसांपूर्वी पत्र लिहून ही मागणी केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून शिवसेनेसोबत युती केली, MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले कारण

मी CA होणारच..! दारात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा, कुटुंबासाठी मंगलचा मोठा संघर्ष

हिटमॅन रोहीतला डच्चू दिल्याने विरेंद्र सेहवाग कोहलीवर भडकला, म्हणाला…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.