मोठी बातमी! नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्या पुणे क्राईम ब्रांचकडून लूकआऊट नोटीस जाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई निलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेण्यात आले होते, पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

आता या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर निलम राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचने लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. राणे यांनी आर्टलाईन प्रॉपर्टिज या कंपनीसाठी कर्ज घेतलं असून या कंपनीच्या कर्जसाठी निलम राणे आणि नितेश राणे हे सहअर्जदार होते.

काही दिवसांपासून नारायण राणे सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा राणे कुटुंबात एक कारवाई होत असल्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच कर्ज खातं हे मुंबईचं आहे. पण पुणे पोलिसांनी ही कारवाई कशी केली? असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

लुकआऊट सर्क्युलर हे नजर ठेवण्यासाठी बजावण्यात येत असते. म्हणजेच राणे कुटुंबियांवर नजर ठेवा अशा सुचना पुणे पोलिसांना देण्यात आल्या आहे. नितेश राणे आणि निलम राणे कुठे जाताय? कुठून आले? याची सर्व माहिती पुणे पोलिसांना द्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते किरीट सोमय्या अडकले! चुकीची माहिती दिल्यानं प्रताप सरनाईक फौजदारी कारवाई करणार
२१ वर्षांपासून ही बहिण सीमेवरच्या सगळ्या जवानांना बांधत आहे राखी, वाचा तिला कोठून मिळाली ही प्रेरणा
विद्यार्थीनीच्या कपड्यांवरून मुख्याधापक बेताल; म्हणाला, कपडे नसते घातले तरी चाललं असतं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.