Narayan Rane : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे. हायकोर्टाने अधीश बंगल्यासंदर्भात मोठा निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना धक्का दिला आहे.
नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या बंगल्याच्या बांधकामावर आक्षेप घेत नारायण राणेंना नोटीस बजावली होती. त्यानंतर राणेंनी हायकोर्टात या बंगल्याचे बांधकाम नियमित व्हावे अशा मागणीची याचिका दाखल केली होती.
मात्र, हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. हायकोर्टाने अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. तसेच नारायण राणेंना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर नारायण राणेंनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
आता सुप्रीम कोर्टाने याबाबत आपला निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत राणेंना अनधिकृत बंगल्याचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने नारायण राणेंना येत्या दोन आठवड्यात अधीश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. अन्यथा महानगरपालिका कारवाई करणार असल्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे.
माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम केले असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणेंना नोटीस बजावल्यामुळे त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, हायकोर्टाने बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर आता आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल, असे राणेंना वाटत होते. परंतु, सुप्रीम कोर्टानेही आता राणेंना बांधकाम तोडण्याचे आदेश देत दणका दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन…., नारायण राणेंची जहरी टीका
Narayan Rane : अधीश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार ; नारायण राणेंना कोर्टाचा दणका
Narayan rane : मी खराखुरा हातोडा देते, तुम्ही नारायण राणेंचा….; शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचं सोमय्यांना थेट आव्हान
कोरोना काळात नरेंद्र मोदींनी अनेक नवीन औषधांचे शोध लावले; नारायण राणेंचा दावा