मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारने विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माझ्या जिवाचे काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नारायण राणे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
“राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध व्यक्तिंना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात काहींची सुरक्षा कमी करण्यात आली तर काहींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला आहे.
राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेची रणरागिणी कडाडली, म्हणाली…
माझीही सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा थेट गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन
फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा गंभीर आरोप, ‘हे कोत्या मनोवृत्तीचे राजकारण’