एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणेंनी शिवसेना का सोडली? वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

सध्याच्या या कोरोनाच्या काळात असे अनेक विरोधी नेते आहेत जे महाविकास आघाडीला आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा कोणताही चान्स सोडत नाहीत. जर त्यामध्ये सगळ्यात जास्त कोणी टीका करत असेल तर अव्वल स्थानी नारायण राणेंचा नंबर येईल.

पण एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणे हे शिवसेनेला सोडून भाजपच्या वाटेवर आले. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा तो आक्रमकपणामात्र ते सोडत नाहीत. वेळ पडली तर ते पक्षनेतृत्वालाही खरे खोटे सांगायला मागे पुढे पाहत नाहीत.

आजच्या घडीला कोकणातील अव्वल नेत्यांमध्ये त्यांचे नाव आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मध्यमंत्री कणकवलीत नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे नारायण राणेंचे राजकीय वजन अजून वाढले आणि आता ते आणखी प्रखरपणे विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत.

आज आम्ही तुम्हाला नारायण राणेंची कारकीर्द सांगणार आहोत. नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२ ला झाला होता. कोकणातून जनतेचा मोठा पाठींबा असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

आक्रमक स्वभावाचे नारायण राणे यांनी शिवसेनेत असताना खुप प्रगती केली. सुरूवातीला ते चेंबुरमध्ये शाखाप्रमुख होते. त्यानंतर १९८५ साली ते बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० मध्ये कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले होते.

१९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला होता. १९९७ साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपविण्यात आले होते.

त्यावेळी मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नारायण राणेंकडे १९९८-९९ साली पदाचा कारभार सोपवण्यात आला होता. २००५ साली त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि नंतर ते काँग्रेसमध्ये सामिल झाले.

२००९ मध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राणेंना उद्योग खाते मिळाले होते. त्यानंतर भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राण यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे एकदा राज ठाकरेंना भेटायला गेले होते. त्याचवेळी राज ठाकरेंनी त्यांना सांगितले की मी ही शिवसेना सोडण्याचा विचार करत आहे. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला की आपण दोघे मिळून एक पक्ष स्थापन करू.

या प्रसंगाबद्दल सांगताना नारायण राणे म्हणाले की, हे ऐकायला जरी छान वाटत असलं तरी मला पाय जमिनीवर ठेवणं भाग होतं. मी त्यांना म्हणालो की, राज, मी एका ठाकरेंसोबत सर्वस्व झोकून काम केलेलं आहे. ठाकरे कुटुंबात काम कसे चालते हे मला चांगले माहिती आहे.

पुन्हा तसा अनुभव घेण्याची माझी तयारी आहे असं मला वाटत नाही. काही नाही झालं तरी बोलूनचालून तुम्ही ठाकरेच, असं म्हणून नारायण राणे तेथून निघून गेले होते. जेव्हा राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा ते स्वस्थ नव्हते.

राणेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याविरोधातच राणेंनी आघाडी उघडली. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांना उद्योग खाते मिळाले होते. राणेंनी यावेळीही टीका करणे काही सोडले नाही.

याचदरम्यान त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी यांच्यावर टीका करणे सोडले नाही. आजही ते टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाढवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..
आईसोबत मेडीकलमध्ये काम करणार मुलगा कसा झाला ऍपलचा सीईओ, वाचा टीम कुक यांची यशोगाथा
भाड्याने पंडित देण्याचा सुरू केला बिजनेस, दरवर्षी कमावतात ७० कोटी रूपये
केस गळाले, चेहऱ्यावरचे तेजही हरपले, कॅन्सरमुळे वाईट हाल झालेत अनुपम खेरच्या पत्नीचे; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.