“माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी”

मुंबई: “माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी” अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्घव ठाकरेंवर टिकास्र सोडलं आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. जो माणूस स्वताच कुटुंब सांभाळू शकत नाही तो राज्य काय सांभाळणार असा घणाघाती सवालही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे नेहमीच आपल्या भाषणात काही गोष्टी सांगत असतात. त्यात कोमट पाणी प्या, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा असे आवाहन मुख्यमंत्री त्यांच्या फेसबूक लाईव्ह मधून करत असतात. या आवाहनांची खिल्ली नारायण राणेंनी उडवली आहे.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यभर राबवली होती. आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्यावी असे आवाहन त्या मोहीमेच्या माध्यमातून राज्य सरकारने केले होते. त्याचीच खिल्ली उडवत “माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी”  असा टोला नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोरोनामुळे आजारी आहेत. त्यांना हॉस्पीटलमध्ये  दाखल केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही कोरोनामुळे आजारी आहेत. त्यावरूनच नारायण राणे म्हणतात की जो माणूस स्वताच कुटुंब सांभाळू शकत नाही तो राज्य काय सांभाळणार ?

राज्यातील कोरोना केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात राज्य सरकारने नवीन निर्बंध लादले आहेत. तरीही कोरोना नियंत्रणात येत नाही. यावरून राज्य सरकारवरील टिकेची झोड वाढतच आहे.

यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे बॉस होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच फक्त गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याने भागणार नाही तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहीजे. अशी मागणी त्यांनी केली. सर्वकाही मुख्यमंत्र्यांना माहीत होते असा आरोप राणेंनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे केली होती. यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
अखेर विकेट पडलीच! अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा;या; कारणामुळे राजीनामा दिला
अजित पवार, जयंत पाटील नाही तर ‘या’ नेत्याला देणार शरद पवार गृहमंत्रीपदाची जबाबदारी
अनिल देशमुख ही मोगलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील; उच्च न्यायालयाने दिले सीबीआयला चौकशीचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.