..तर राज्यात भाजप राष्ट्रवादीचे सरकार येऊ शकते- नारायण राणे

राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. अंबानींच्या घरासमोर स्फोटके सापडल्यानंतर आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्युनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. तसेच गृहमंत्र्यावर झालेल्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंनी या प्रकरणावर काहीही बोलणे टाळले आहे.

हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चांना उधान आले आहे. त्यातच आता नारायण राणे यांनी राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात सुचक विधान केले आहे.

नारायण राणे यांना विचारण्यात आले की, शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होणार का? यावर नारायण राणे म्हणाले की, केंद्रातून कसा आदेश येतो तेच आता बघायचं.

वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची, असं राणे म्हणाले. ते असेही म्हणाले की अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी नाही. त्यांच्याशिवायही सरकार उभे राहू शकते, असं सुचक वक्तव्य त्यांनी दिलं आहे. दरम्यान शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीवरून राजकारण तापलेले आहे.

राष्ट्रवादी भाजपसोबत येणार अशा चर्चांना उधान आले आहे. तर राष्ट्रवादीने या भेटीचे खंडण केले आहे. तर स्वता अमित शहांनी यावर बोलताना सांगितले की, सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात. त्यामुळे राज्यात पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या
पवार-शहा भेटीच्या चर्चेनंतर भाजपा आमदाराने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; उडाली खळबळ
छातीची हाडे तुटली होती हृद्य आणि फुफ्फुसे तर डोळ्यांनी दिसत होते, अशावेळी धावून आला देवमाणूस
भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध; मुख्यमंत्र्यांची कोंडी…
ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.