नारायण राणे यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यु; कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सतत चर्चेत येत आहे. असे असताना नारायण राणे हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नारायण राणे यांच्या गाडीचा ड्रायव्हरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. पण त्यानंतर त्याच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहे.

ड्रायव्हर अशोक कुमार वर्मा हे वैद्यकीय सुट्टीवर असतानाही त्यांना निलंबित करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ड्युटीवर बोलवण्यात आले होते, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक वर्मा यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. ते उत्तर प्रदेशातील राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लखनऊ दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची ड्युटी लावण्यात आली होती.

त्यावेळी ते वैद्यकीय रजेवर होते, त्यामुळे वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांना कामावर बोलवण्याचा गंभीर आरोप कुटुंबान केला आहे. आता कुटुंबाने संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे.

नारायण राणे लखनऊ दौऱ्यावर असताना अशोक वर्मा यांची ड्युटी लावण्यात आली होती. पण ड्युटीवर असतानाच अशोक वर्मा यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

अशोक वर्मा यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यानंतर कुटुंबाने गंभीर आरोप करत हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपाय करुन पुढील कारवाई केली जाईल. पोस्ट मार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. आता रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढीला कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकारी राघवेंद्र यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारताच्या ‘या’ चार धुरंधरांमुळे भारतीय संघाला इंग्लंडले करता आले चितपट; वाचा कोण होते ते चार खेळाडू
टीम इंडियाने रचला इतिहास: ओवल टेस्ट मध्ये कॅप्टन कोहली, बुमराह आणि शार्दुलने बनवला विक्रमी रेकॉर्ड
अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणीत वाढ, आता बलात्काराचा गुन्हा दाखल, जिल्ह्यात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.