शिवसेना थापाड्यांचा पक्ष, ‘या’ आमदारापेक्षा गावचा सरपंच सरस; राणेंची घणाघाती टिका

नारायण राणे आणि शिवसेनेचे नाते सर्वश्रुत आहे. असा एकही दिवस नसतो ज्या दिवशी राणे कुटुंबीय सेनेवर निशाणा साधत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र सडकून टीका करतात मात्र नुकत्याच झालेल्या एका सभेत नारायण राणे यांचे एक वेगळे रूप देखील कोकण वासियांनी अनुभवले. ते सोमवारी सावंतवाडीत आयोजित भाजप मेळाव्यात बोलत होते. याच्या पुढील सर्व निवडणूक भाजप कसे जिंकेल यावर भर द्या आपपसातील वाद मिटवा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

 

केंदीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील सभेत थेट शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. राणे म्हणाले, शिवसेना हा थापाड्याचा पक्ष आहे.आणि येथील आमदार ही शेमड्या आहे मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतात मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. येथील आमदारा पेक्षा गावचा सरपंच सरस असतो अशी टिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता केली.

 

या मतदार संघासह कुडाळ व लोकसभेची जागा आमच्याकडे नाही,याची खंत वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात या तीनही जागा भाजपकडे येण्यासाठी प्रयत्न करा भाजपला यश मिळण्यासाठी सर्वांनी कामाला लागा.आपापसात मतभेद नको. काही झाले तरी,आम्हाला यश मिळाले पाहिजे. मी आता दिल्लीत आहे.त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा असा तुमच्याकडून मला शब्द पाहिजे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करा. प्रामाणिकपणे काम करा, कोणावर अन्याय होणार नाही,याची जबाबदारी मी घेतो असे ,म्हणत राणेंनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

 

शिवसेना आमदारांवर टीका करून झाल्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एरवी ठाकरेंविरोधात गरळ ओकणाऱ्या राणेंनी यावेळी मात्र कोकणवासीयांना आश्चर्याचा धक्का दिला. मी मुख्यमंत्र्यांबाबत काही बोलणार नाही कारण ते आजारी आहेत असे विधान करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एरवी ठाकरेंना रडारवर ठेवणाऱ्या नारायण राणेंनी चक्क मुख्यमंत्र्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवल्यामुळे सर्वच आश्यर्यचकित झाले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शैलेंद्र दळवी,संध्या तेरसे,अंकुश जाधव,पुकराज पुरोहित,शर्वनी गावकर,प्रमोद कामत,महेश सारंग,गुरुनाथ पेडणेकर,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडीवरेकर,परिमल नाईक,दीपाली भालेकर,निकिता सावंत,मानसी धुरी,महेश धुरी,अजय गोंदावले,दिलीप भालेकर,प्रमोद गावडे,केतन आजगावकर,जावेद खतीब आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.