Narayan Rane : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवून नवीन नाव आणि चिन्ह दिल्यानंतर अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” असे नाव देण्यात आले आहे. तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर त्यांना “मशाल” हे नवे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे मशाल हे नवीन चिन्ह क्रांती घडवेल असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
यावरूनच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले की, क्रांती घडवायची तर सत्तेत मुख्यमंत्री असताना क्रांती घडवली नाही. लोकांच्या घराला उध्वस्त करायला मशाली लावल्या. तुमच्या नावात उद्धव आहे परंतु, उध्वस्त करायला मशालीच्या उपयोग करू नका, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तसेच पुढे ते म्हणाले की, मशाल काळोखातून रस्ता काढायला वापरतात. त्यांना दिसत नाही का? एवढा उजेड आहे कशाला मशालीची गरज आहे. तसेच लोकांना अन्न, धान्य, घर, नोकरी हे प्रश्न आहेत, असेही ते म्हणाले. धनुष्यबाणात ते उजेड पाडू शकले नाही आता मशालीत काय पाडणार?, अशी खोचक टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना क्रांती घडवली नाही, अशी टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव देण्यात आले आहे. याबद्दल एक मेसेज व्हायरल होत आहे. यावरून राजकारण रंगल्याचेही पाहायला मिळाले.
शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. नारायण राणेंनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Narayan Rane : नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; अधीश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश
uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन, नारायण राणेंची जहरी टीका
Narayan Rane : अधीश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार ; नारायण राणेंना कोर्टाचा दणका
Narayan rane : मी खराखुरा हातोडा देते, तुम्ही नारायण राणेंचा; शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचं सोमय्यांना थेट आव्हान