Share

शिवसेना संपायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार कारण.., नारायण राणेंची सडकून टीका

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर ठाणे आणि कल्याण डोंबिवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला. दिवसेंदिवस शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.(narayan rane criticize uddhav thkare & aaditya thakare)

या सर्व घडामोडींवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असून त्यांना सरकार वाचवता आले नाही. आता शिवसेना कदापि उभी राहणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने सरकार पडायची भाषा करू नये, असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, “मुख्यमंत्री असताना आमदार, खासदार यांना न भेटणे. तसेच मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे. यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच हे आमदार फुटले आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे नेण्याचे काम केले आहे.”

“राणेंना टार्गेट करणे हा ठाकरे यांचा एकमेव उद्देश होता. शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असून त्यांना सरकार वाचवता आले नाही. याच्या सारखे दुर्देव ते काय?आता शिवसेना कदापि उभी राहणार नाही”, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, “आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करीत असून नवनवीन प्रकल्प राज्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करतील, असा मला विश्वास आहे”, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहा महिन्यात नवीन सरकार कोसळेल, असे वक्तव्य केले होते.

या वक्तव्यला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, “महाराष्ट्रात सतत सरकार कोसळत राहिले तर महाराष्ट्राचा विकास कसा होणार?हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने सरकार पडायची भाषा करू नये”, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागणार, गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर
शिवसैनिक रस्त्यावर, थेट उद्धव ठाकरेंनाच दिला अल्टिमेटम; वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?
रोहित शर्माने घातला धुमाकूळ, विराटचाही विक्रम मोडत ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now