अर्णबसाठी आता नारायण राणे मैदानात; म्हणाले, अर्णबच्या जीवाला काही धोका झाला तर…

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली असून त्याना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते.

याचाच धागा पकडत भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल,’ असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

‘गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, ट्विटकरत राणे पुढे म्हणतात, ‘गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,’ असे म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
म्हातारपणात लग्न केले म्हणुन सोशल मिडियावर उडवली खिल्ली; पण कारण तर जाणुन घ्या
बाॅलीवूड चित्रपटांमधील ‘ही’ सुंदर अभिनेत्री आहे सुपरस्टार गोविंदाची मुलगी
बुलेट लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! रॉयल एनफिल्डची शानदार meteor 350 बाईक लॉन्च, किंमत फक्त…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.