Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘अर्णबचा छळ सुरूय; त्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास ठाकरे सरकार जबाबदार’

Dhanashri Rout by Dhanashri Rout
November 22, 2020
in ताज्या बातम्या, इतर, राजकारण, राज्य
0
‘तो’ अहवाल प्रसिद्ध होताक्षणी ठाकरे सरकार पडणार; वाचा असे काय आहे त्या अहवालमध्ये

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली असून त्याना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते.

याचाच धागा पकडत भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल,’ असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

‘गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, ट्विटकरत राणे पुढे म्हणतात, ‘गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,’ असे म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगरमध्ये उडाली खळबळ! जलसंधारण मंत्र्याच्या घरी सापडला मृतदेह
आयुष्यभर ब्रम्हचारी राहीलेल्या पत्रकाराने ६५ व्या वर्षी लग्न केले; कारण ऐकून डोळ्यांत पाणीच येईल
सीरम इंस्टीट्यूटमध्ये तीन कोटी कोरोना लशी तयार; ‘या’ दिवशी येणार बाजारात
फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Tags: BJPCM udhav thackerayNarayan raneअर्णब गोस्वामीउद्धव ठाकरेनारायण राणे
Previous Post

बाॅलीवूड पुन्हा हादरले! चित्रपट निर्मात्याच्या घरावर एनसीबीचा छापा; सहा किलो ड्र.ग्ज जप्त

Next Post

कंगना पुन्हा बरळली! जो बायडन यांच्या आजाराबाबत जे बोलली ते ऐकून तुम्हालाही वाईट वाटेल

Next Post
कंगनाचा पाय खोलात! आता आणखी एका गंभीर प्रकरणात तक्रार दाखल

कंगना पुन्हा बरळली! जो बायडन यांच्या आजाराबाबत जे बोलली ते ऐकून तुम्हालाही वाईट वाटेल

ताज्या बातम्या

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

January 15, 2021
धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

January 15, 2021
रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

January 15, 2021
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

…तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं मोठं कारण

January 15, 2021
तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

January 15, 2021
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

January 15, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.