Share

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, नारायण राणेंची घणाघाती टीका

narayan rane ani thackeray

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला होता. यावरून आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.(narayan rane criticize cm uddhav thakre)

आज मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील सभेवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये जेमतेम ३० ते ३५ हजार लोक होते. तीनशे रुपये देऊन फेरीवाल्यांना या सभेसाठी आणण्यात आलं होतं”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या, याची माहिती द्यावी. तुम्ही चुली पेटवण्याचं नाही तर चुली उध्वस्थ करण्याचं काम केलं आहे. तुम्ही मराठी तरुणांच्या हातात दगड दिले. तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणण्याची देखील लाज वाटते”, असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, “१४ तारखेला मोठा गवगवा करून मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी सभा घेतली. पण सभा किती भरली आणि त्यासाठी खर्च किती आला असेल, याचा अंदाज जनतेला आला आहे. मुख्यमंत्री असून देखील जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे यांनी मुलगा म्हणून बाळासाहेबांना विश्वास देखील दिला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, तुमचा चेहरा आरशात जाऊन बघा, आम्ही तुम्हाला काय म्हणायचे?”, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण शिवसंपर्क नसून शिव्या संपर्क आहे, असा खोचक टोला देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “लाखाची सभा तुमच्या नशिबी नाही हो. बाळासाहेबांची पाच लाख लोक उपस्थित असलेली सभा मी पहिली आहे. यांच्या सभेमध्ये जेमतेम ३० ते ३५ हजार लोक होते. आम्ही मर्द आहोत हे यांना सांगावं लागतं. शिवसेनेवर बोलणाऱ्यांना आम्ही अंगावर घेतलं म्हणून आज मुख्यमंत्री झालात”, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘लक्षात ठेव, तुला पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर..; जेष्ठ अभिनेत्रीने केतकीला झाप झाप झापले
‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर काश्मीर फाइल्सवर बंदी घाला’ फारूक अब्दुल्लांनी केली मागणी

‘काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; कॉंग्रेसच्या राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now