कोण अब्दुल सत्तार? काय करतो?, नारायण राणेंच्या जिभेवरचा ताबा सुटला

मुंबई | मंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची फनी केली. याचबरोबर नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे आश्वासन सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

याचाच धागा पकडत भाजप नेते नारायण राणे यांनी सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. याचबरोबर सत्तार यांच्यावर टीका करताना राणे यांच्या जिभेवरचा ताबा देखील सुटला आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोण आहेत? असा सवाल राणे आणि उपस्थित केला आहे.

याबाबत ते सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले, राज्याचा महसूलमंत्री काँग्रेसचा आणि राज्यमंत्री शिवसेनेचा, कोण विचारतंय? काहीही बोलतो, अशा शब्दात ऐकरी उल्लेख करत राणे यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे बोलताना राणे म्हणाले, ‘सत्तारांना मी गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखतोय. ते अगोदर अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिरायचे. त्यांना कोकणाबाबत काय माहिती आहे? महसूल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत? असे सवाल उपस्थित करत राणे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, ‘आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल,’ असे देखील नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…
तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.