नंदीग्राममधल्या पराभवावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या बहूचर्चित नंदीग्राममधून मतदार संघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना फार थोड्या मताने पराभव केल्याचे वृत्त आहे.

आता नंदीग्राममधल्या पराभवानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंदीग्रामध्ये झालेला पराभव मी स्वीकार करते. नंदीग्राममध्ये जे काही झाले ते विसरुन जा. तृणमुल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये बहूमताने विजय मिळवला आहे, अशी प्रतिक्रीया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

तसेच कोरोना संपल्यानंतर विजयाचा जल्लोष केला जाईल. सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे कोणीही विजय साजरा करु नये, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच पश्चिम बंगालच्या सर्व नागरीकांचे मोफत लसीकरण केले जाईल, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी आता तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहे. तसेच यंदा कोरोनामुळे शपतविधीचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कोरोना हे आपले पहिले प्राधान्य आहे, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अशावेळी नंदीग्रामचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये. असं ट्विट तृणमुल काँग्रेसने केल आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी वियजी होणार की पराभुत या बाबत आणखी संस्पेंस वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

हॉलीवूडच्या ‘या’ दिग्दर्शकाची ऐश्वर्यावर होती वाईट नजर; अभिनेत्रीला एकटीला बोलवायचा रुमवर
…म्हणून सनी देओल अमिताभला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडतो
जामिनावर सुटलेला आहात जास्त बोलु नका, नाहीतर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.