नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; ‘सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो’

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

फोन टॅपिंग प्रकरणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. फडणवीस यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसेच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटले होते.

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. ;या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये झालेली पापं राज्य सरकारने उघड करावीत, असा पलटवार पटोले यांनी केला.

दरम्यान, परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असेही पटोले यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

काँग्रेसचा शिवसेनेवर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; राजकीय वातावरण तापलं

लॉकडाउन होणार का? पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी केली भूमिका स्पष्ट

माजी पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेले ते बंटी बबली म्हणजे फडणवीस आणि रश्मी शुक्ला?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.