दुकानाला आग लागलेली पाहून नाना पटोलेंनी गाडी थांबवली, अन् त्यानंतर…

मुंबई : काही दिवसांपासून राज्यात आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे.

काल शुक्रवारी रात्री १ वाजून ४० मिनिटांनी नाना पटोले हे भिवंडीवरुन परतत असताना त्यांची नजर परेल येथील आगीवर पडली. त्यांनी तात्काळ त्यांची ताफा तिथे थांबवला. आग आटोक्यात येत नाही तोपर्यंत तिथेच थांबून राहिले होते. नाना पटोले यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं तिथे उपस्थित असणाऱ्यांनीही कौतुक केले.

दरम्यान, याबाबत पटोले यांनी ट्विट करत म्हंटले की, “काल रात्री भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून रात्री १:४० वाजता परत येत असताना परेल येथील एका इमारतीला आग लागलेली बघुन तत्काळ ताफा थांबविला लगेच पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेडला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात येईपर्यंत थांबून राहीलो.’

भांडुपच्या आगीत १२ करोना रुग्णांचा मृत्यू…
भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याने तेथील करोना रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जर यात दिरंगाई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी सूचना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

संजय राऊतांनी ‘पायरी’ दाखविल्यानंतर नाना पटोले संतापले; वाचा काय म्हणाले…

“मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव”

आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं; वाचा संपूर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.