संजय राऊत तुम्ही काय शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? नाना पटोलेंनी राऊतांना झापले

मुंबई | राज्यात घडत असलेल्या घटनांवरून राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांवर आक्रमक झाली आहे.

शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, ज्याने युपीए मजबूत होईल. असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले, युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. ज्या गोष्टीचा संबंध नाही. त्यावर संजय राऊतांनी चर्चा करू नये इतकाच आमचा सल्ला आहे.

मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का? असा उल्लेख केला होता. असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंगांनी लावलेल्या आरोपानंतर काँग्रेसचे दिल्लीतील नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. राज्यात घडत असलेल्या घटनांमूळे काँग्रेसची बदनामी होत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत
युपीए अधिक मजबुत झाली पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदिर्घ काळ युपीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. मात्र सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठिक नसते.

देशात घडत असलेल्या घटनांमुळे युपीएचे नेतृत्व काँग्रेस बाहेरील नेत्याने करावे, असं देशातील अनेक पक्षांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे, ज्याने युपीए मजबूत होईल.

महत्वाच्या बातम्या-
“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली
“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
“फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करतात आणि विचारतात…”
एसीबीचे अधिकारी घरावर धाड टाकायला आले, अन् लाचखोर तहसीलदाराने जाळल्या २० लाखांच्या नोटा

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.